गुजरातमध्ये काँग्रेसला झटका, राज्यसभेचे गणित बिघडले; 3 महिन्यात 8 आमदारांनी ‘हात’ सोडला

909

गुजरातमध्ये काँग्रेसला झटका बसला असून आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसचे राज्यसभा निवडणुकीचे गणित बिघडले आहे. शुक्रवारी बृजेश मेरजा यांनी राजीनामा दिला, तर गुरुवारी दोन आमदारांनी राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यात तब्बल 8 आमदारांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला आहे.

गुजरातमध्ये 19 जूनला राज्यसभेच्या 4 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 4 जागांसाठी भाजपने रमीलोबन बारा, अभय भारद्वाज आणि नरहरी अमीन असे तीन उमेदवार दिले आहेत. तर काँग्रेसने शक्तीसिंह गोहिल आणि भरतसिंह सोलंकी यांना तिकीट दिले आहे.

भाजपचे पारडे जड
काँग्रेस आमदारांनी राजीनामा देण्यापूर्वी भाजप संख्याबळाच्या जोरावर फक्त 2 जागा जिंकत होती. मात्र आता काँग्रेसच्या 8 आमदारांनी राजीनामा दिल्याने तिसऱ्या जागेवरही भाजपचे पारडे जड मानले जात आहे.

8 आमदारांचा राजीनामा
तत्पूर्वी गेल्या 3 महिन्यात काँग्रेसच्या 8 आमदारांनी राजीनामा दिला. मार्च महिन्यात प्रवीण मारू, मंगल गावित, सोमाभाई पटेल, जेवी काकड़िया आणि प्रद्युम्न जडेजा या पाच आमदारांनी राजीनामा दिला. तर गुरुवारी अक्षय पटेल आणि जीतू चौधरी यक दोन आमदारांनी काँग्रेसला रामराम केला. यात शुक्रवारी आणखी एका आमदाराची भर पडली.

आपली प्रतिक्रिया द्या