भीषण अपघातानंतर एकामागोमाग एक 27 सिलिंडरचा स्फोट, 26 विद्यार्थी वाचले

695

गुजरातमध्ये गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला. सूरतवरून एलपीजी सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकची आणि दुसऱ्या ट्रकशी समोरासमोर धडक झाली. यानंतर ट्रकमध्ये आग लागली आणि एकामागोमाग एक 27 सिलिंडरचा स्फोट झाला. याचवेळी दुसऱ्या बाजूने येणारी स्कूल बस आणि ऑटो रिक्षासह अन्य तीन वाहने आगीच्या विळख्यात सापडली. ही घटना घडली तेव्हा बसमध्ये 26 विद्यार्थी होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांना वाचवले आहे. सुदैवाची गोष्ट म्हणजे अपघातामध्ये कोणालाही जीव गमवाला लागला नाही.

झी न्यूज‘ने दिलेल्या वृत्तानुसार, सूरतमधील रेडियन्ट इंटरनॅशल स्कूलची बस विद्यार्थ्यांना घेऊन सकाळी स्कूलकडे रवाना झाली. याचवेळी सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकची दुसऱ्या ट्रकशी धडक झाली आणि भीषण आग लागली. आगीमुळे एकामागोमाग एक 27 सिलिंडरचा स्फोट झाला. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले.

अपघातानंतर सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की याचा आवाज चार किलोमीटर दूरही ऐकू आला. स्फोटानंतर काही सिलिंडर हवेमध्ये शेकडो फूट वरती उडाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या