गुजरातच्या पाटण येथे भीषण अपघात, जीप ट्रकला आदळून सात जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातच्या पाटण जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याचं वृत्त आहे. जीप आणि ट्रकची टक्कर झाल्याने हा भीषण अपघात झाला असून त्यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे.

पाटणमधील वराही येथून जाणाऱ्या या जीपमध्ये अनेक जण प्रवास करत होते. तेव्हा समोरून वेगाने येणाऱ्या ट्रकसोबत त्याची टक्कर झाली. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. सध्या मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.