
चुकीच्या वक्तव्यांमुळे आणि कृतीमुळे भाजप पक्ष सध्या चर्चेत आहे. यामुळे पक्षात अस्वस्थता देखील आहे. गुजरातच्या सुरत येथे आणखी एक प्रकरण समोर आले. जिथे भाजपने आपल्या एका नेत्याला त्याच्या कृतीमुळे निलंबित केले आहे. तेथील भाजप नेत्याने एका महिलेचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोप की अरण्यात आला आहे.
गुजरातमधील सुरतच्या चौर्यासी येथे ही घटना घडली आहे. आस्तिक पटेल असे या भाजप नेत्याचे नाव आहे. आस्तिक पटेल याने दोन दिवसांपूर्वी सरपंचांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये एका विवाहित महिलेसोबत झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. याशिवाय त्याने या महिलेचा आंघोळ करतानाचा आक्षेपार्ह फोटोही शेअर केला होता.
त्याने हे फोटो शेअर करताच एकच खळबळ उडाली. अनेक नेत्यांनी पटेल याच्या विरोधात आपला निषेध नोंदवला, तर काहींनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. सोशल मीडियावर अश्लील फोटो टाकल्याने या नेत्याला भाजपमधून निलंबित करण्यात आले आहे. गेल्या 10-12 वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असणाऱ्या आस्तिक पटेल याचे प्राथमिक सदस्यत्वही पक्षाने रद्द केले आहे.
सुरत जिल्हा भाजप अध्यक्ष संदीप पटेल यांनी ही कारवाई करत आस्तिक पटेल यांना भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वावरून आणि चौरासी तहसील पंचायतीच्या प्रमुखपदावरून निलंबित केले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.


























































