पत्नीने बदनामी केल्याने एचआयव्हीग्रस्त पतीची आत्महत्या

860
प्रातिनिधिक

गुजरातमधील अहमदाबाद येथे पत्नीने बदनामी केल्याने एका 27 वर्षीय एचआयव्हीग्रस्त विवाहीत तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. शहरातील अमराईवाडी भागातील  सुखसागर सोसायटीत ही घटना घडली आहे. मृत्यूपू्र्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने आपल्याला आत्महत्येसाठी पत्नी, सासू आणि मेव्हण्याने प्रवृत केल्याचा आरोप केला आहे.

सुसाईड नोटमध्ये तरुणाने पत्नी व तो 12 वर्षांपासून रिलेशिनशिपमध्ये होते. चार वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाल्याचे म्हटले आहे. तसेच त्यावेळी आपल्या आजाराबद्दल तिला माहित होते. पण आज तीच माझ्या आत्महत्येचे कारण असल्याचं म्हटले आहे. तसेच माझ्या आजाराची माहिती सार्वजनिक करुन पत्नी, सासू आणि मेव्हण्याने समाजात आपली बदनामी केली. त्यामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचा आरोप तरुणाने सुसाईड नोटमध्ये केला आहे.

याप्रकरणी तरुणाच्या वडिलांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आपल्या तक्रारीत त्यांनी लिहले आहे की मुलाने त्याच्या आजाराबद्दल घरातल्यांना सांगितले होते. जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचारही सुरू होते. दरम्यान, मृत तरुणाचे पती सुरक्षा रक्षक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या