देवगड – जिवंत काडतूस व बंदूकांसह शिकाऱ्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिकारीसाठी आलेल्या 5 जणांना शिरगाव चेकपोस्टवर सात जिवंत काडतुसांसह व एका बंदुकी सह देवगड पोलिसांनी पकडले असून देवगड पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्वजण शिकारीसाठी जात होते यामध्ये संभाजी भिवाजी परब रा. अणाव, गितेश संतोष चव्हाण रा. देवली, गुरुदत्त वैकुंठ खोबरेकर रा. कवठी, शंकर मनोहर पालव रा. अणाव, विरेंद्र गणपत पालव रा. अणाव त्यांच्याकडे 3,00,000 रु. किंमतीची एक स्कॉर्पिओ वाहन 20,000 रु. किंमतीची दोन नळीची बंदुक 840 रु. किंमतीची 7 जिवंत काडतूस या संशयितांकडे आढळून आली आहेत यातील संशयित आरोपी हे आपल्या ताब्यातील वाहनातून देवगडकडे येत असतेवेळी शिरगांव चेकपोस्ट येथे नाईट चेकींग अंमलदार व चेकपोस्ट कर्मचारी यांनी वाहनाची तपासणी केली असता 7 जिवंत काडतुस एका बंदूकसह रानटी जनावराची शिकार करण्याच्या उद्देशाने फिरताना आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास देवगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहे.