माझ्या वडिलांकडून…; तारक मेहताच्या रोशन सिंग सोढीने बेपत्ता होण्यावर सोडलं मौन

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील रोशन सिंग सोडी म्हणजे अभिनेता गुरुचरण सिंग एप्रिल-मे दरम्यान 25 दिवस बेपत्ता होता. दिल्ली पोलिसांपासून मुंबई पोलिसांपर्यंत सगळेच अभिनेत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्याचा फोनही ट्रेस करण्यात आला. पण अभिनेत्याला शोध्यात पोलिसांना अपयश आले. अखेर 25 दिवसांनंतर स्वतः रोशन सिंग सोढीची भूमिका करणारे गुरुचरण सिंग आपल्या दिल्लीतील घरी परतले. आता टेली टॉक इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे.

तब्बल 25 दिवसांनंतर घरी परतल्यानंतर अभिनेता गुरुचरण यांनी टेली टॉक इंडियाला मुलाखत दिली आहे. “मी सध्या या विषयावर काहीही बोलू शकत नाही. कारण सध्या काही कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया संपल्यानंतर, माझ्या बाजूने हे पाऊल का उचलले गेले हे मी स्पष्ट करेन. पण मी कोणतेही विधान करण्यापूर्वी मला काही गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच मी सर्व गोष्टींबद्दल उघडपणे बोलेन”, असे त्यांनी सांगितले. कुटुंबापासून दूर आध्यात्मिक प्रवास करण्यासाठी आपण तीन आठवडे बेपत्ता होतो, अशी कबुली अभिनेता गुरचरण सिंग यांनी दिली.

“मला जे काही साध्य करायचे होते ते जवळपास पूर्ण झाले आहे. माझ्या वडिलांच्या बाजूने फक्त काही कायदेशीर प्रक्रिया बाकी आहेत. निवडणुका सुरू असल्यामुळे थोडी वाट पहावी लागत आहे. पण योग्य वेळ आल्यावर मी हा निर्णय का घेतला हे सर्व काही सांगेन”, असे ते म्हणाले. यावेळी अभिनेत्याने आपल्या तब्येतीबद्दलही सांगितले. आता मी पूर्णपणे बरा आहे. काही कालावधीपूर्वी मला डोकेदुखीचा त्रास होत होता. मात्र आता मी पूर्णपणे बरा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तारक मेहता का उल्टा चष्माचा सोढी 25 दिवसांनी घरी परतला; सांगितले बेपत्ता होण्याचे कारण…