बीडमध्ये गुटख्याचा टेम्पो पकडला; माफिया धास्तावले

42

सामना प्रतिनिधी । बीड

बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास भाटसांगवी गावाजवळ पोलिसांनी एक टेम्पो अडवला. चालकाची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली. त्यात गुटखा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी टेम्पो जप्त केला आहे. पिपंळनेर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा पकडल्याने गुटखा माफियात खळबळ उडाली असून कारवाईच्या भीतीने ते धास्तावले आहेत. ही कारवाई पिपंळनेर पोलीस ठाण्याचे श्रीकांत उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जप्त केलेल्या गुटख्यामध्ये बाबा ,गोवासह इतर गुटख्याची पाकिटे आहेत. जप्त केलेला गुटखा दहा लाखांचा असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या