बीड पोलिसांनी केला ५५ लाखांचा गुटखा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

सोलापूर-संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गावरून बीड बायपासने एक ट्रक जात आहे. त्यात गुटख्याने भरलेले खचाखच पोते आहे. या माहितीवरून एडीएस पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी नामलगाव फाट्यावर सापळा रचून ट्रक पकडला. ज्यात ५५ लाख रूपयाचा गुटखा सापडला. पिठाच्या गोण्यामध्ये गुटखा लपवून ठेवल्याचे आढळून आले.

गुरूवारी सकाळी बीड बायपासने एक ट्रक संभाजीनगरकडे रवाना होणार आहे. त्यात गुटख्याचे पोते आहे, अशी माहिती बीड एडीएसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधिक्षक सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी त्यांच्या टिमसह नामलगाव फाट्यानजिक सापळा रचून हा ट्रक पकडला. या ट्रकमध्ये तब्बल ५५ लाख रूपयांचा गुटखा असल्याचे आढळून आले. हा गुटखा पिठाच्या गोण्यांमध्ये भरला होता. बीड पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.