पुणे – हडपसरमध्ये मद्यधुंद वाहन चालकाची तीन वाहनांना धडक

908

हडपसरमध्ये एका मद्यधुंद मोटार चालकाने तीन वाहनांना धडक दिल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घटना घडली असून नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. हडपसर पोलिसांनी मोटार चालकाला ताब्यात घेतले आहे. हडपसर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, भेकराई नगरमधील आयबीएम समोर मद्यधुंद मोटार चालकाने रस्त्यावर असलेल्या तीन गाड्यांना ठोकर मारत काही अंतर फरफटत नेले.  अचानक रहदारीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने नागरिकांची धावपळ उडाली. त्यामुळे नागरिक सैरभैर पळत होते. त्यानंतर नागरिकांनी चालकाला पकडून पोलिसांना घटनेची माहिती दिली. हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले. या घटनेत किती लोक जखमी झाले आहेत, याची माहिती मिळाली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या