
तडीपार कालावधीतही हडपसर परिसरात आलेल्या सराईताला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने अटक केली. प्रतिक ऊर्फ नोन्या संजय वाघमारे (वय 23 रा. शांतीसागर वसाहत, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी तडीपार प्रतीक वाघमारे हडपसरमधील घरी आल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याच्याकडे शहरामध्ये येण्यासाठी न्यायालयाची पूर्व परवानगी घेतली नसल्याचे उघडकीस आले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र कदम, शाहिद शेख, गणेश पाटोळे, गणेश ढगे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर यांनी केली.



























































