2021 पासून दागिन्यांवर आता हॉलमार्क सक्तीचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
gold

दागिन्यांमध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी आता दागिन्यांवर हॉलमार्क सक्तीचा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 15 जानेवारी 2021 पासून हॉलमार्क सक्तीचा असेल अशी माहिती केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिली.

15 जानेवारी 2020 रोजीच याबाबतची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे, परंतु त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी एक वर्षापर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. सध्या हॉलमार्किंग ऐच्छिक आहे. देशभरात केवळ 40 टक्के दागिन्यांवरच हॉलमार्ंकग आहे. हॉलमार्किंग म्हणजे सोन्याच्या शुद्धतेचा पुरावा असतो.

देशभरात 800 हॉलमार्किंग सेंटर आहेत. जगभरात सर्वाधिक सोन्याची आयात हिंदुस्थानात होते. हॉलमार्क म्हणजेच सोन्याच्या दागिन्यांवर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्स (बीआयएस) चे चिन्ह असते. हॉलमार्किंगसाठी केवळ बीएसआयलाच सरकारने परवानगी दिली आहे, मात्र अनेक सराफ स्वतःच दागिन्यांवर हॉलमार्किंग करतात. त्यामुळे ग्राहकांनी दागिने खरेदी करताना आधी बीआयएसचे हॉलमार्किंग आहे की नाही याची खातरजमा करावी असे आवाहन सरकारने केले आहे.