पडद्यावरील ‘बने’ कुटुंबांच्या उपस्थितीत रंगले ‘बने संमेलन’

सामना ऑनलाईन । मुंबई

कौटुंबिक विरंगुळा आणि मनोरंजन म्हणून अनेक ठिकाणी सदस्यांतर्फे सदस्यांसाठी संमेलन आयोजित केले जाते ज्यामध्ये दैनंदिन आयुष्यातील सर्व काही ताण-तणाव, तसेचकामं बाजूला सारून काही दिवस स्वत:च्या सुखासाठी, आनंदासाठी हक्काने दिला जातो. स्पर्धा, धमाल-मस्ती-मज्जा, खेळ यांसारख्या अनेक गोष्टी या मनोरंजक संमेलनात मोडतात. अशाच पद्धतीचे एक दिवसीय कौटुंबिक ‘बने संमेलन’ दादर येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात बने कुटुंबिय मोठ्या संख्येने सामील झाली होती.

सोनी मराठी वाहिनी आणि त्यावरील कार्यक्रमांची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात होतेय हे अनेकदा प्रेक्षकांकडून येणा-या प्रतिसादामुळे दिसून आलंय. या वाहिनीवरील प्रत्येकमालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा या लोकप्रिय ठरत आहेत. आपल्या भोवताली ‘बने’ असं कोणाचं आडनाव जरी उच्चारलं गेलं तरी लगेच ‘ह.म.बने तु.म.बने’च्या कुटुंबाचीआठवण अनेकांना येते. ही मालिका आणि बने कुटुंब प्रेक्षकांना आपलीशी वाटतेय, म्हणूनच तर दादर येथील बने संमेलनात बने कम्युनिटीच्या वतीने ‘ह.म.बने तु.म.बने’मालिकेतील बने कुटुंबाला आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले होते. प्रेक्षकांचे प्रेम आणि आपुलकी पाहता सोनी मराठीवरील बने कुटुंब या संमेलनात स्वखुशीने आणि उत्साहाने उपस्थित देखील राहिले होते.

‘ह.म.बने तु.म.बने’ ही हलकी-फुलकी, मनोरंजक मालिका प्रेक्षकांची फेव्हरेट मालिका बनली आहे आणि या मालिकेत गंभीर विषयांवर हसतमुखाने केलेले भाष्य किंवा एपिसोडहे प्रेक्षकांना जास्त भावतं. त्यामुळे बने कुटुंब आणि त्यातील प्रत्येक सदस्य हा आपल्यातलाच एक आहे असं त्यांना वाटतं. प्रश्न-उत्तरं, क्विज, काही घरगुती खेळ या संमेलनातखेळले गेले आणि या संमेलनाचे कौटुंबिक स्वरुप असल्यामुळे प्रत्येकांनी यामधील खेळांचा आनंद लुटला.

आपली प्रतिक्रिया द्या