
सामना ऑनलाईन । ब्रेडा
हिंदुस्थानला चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. शूटआऊटपर्यंत ताणलेल्या किताबी लढतीत ऑस्ट्रेलियाने ३-१ गोल फरकाने बाजी मारत १५व्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला. या आधी २०१६ मध्येही किताबी लढतीत हिंदुस्थानचा शूटआऊटमध्येच पराभव झाल्याने उपविजेतेपदाकर समाधान मानाके लागले होते.
पेनल्टी शूटआऊटमध्ये अनुभकी सरदार सिंगला अचूक निशाणा साधण्यात आलेले अपयश, हरमनप्रीत सिंहने निर्धारित ८ सेकंदांपेक्षा जास्त केळ लाकून केलेला अकैध गोल आणि ५ पेनल्टी कॉर्नरवर दवडलेल्या संधी हिंदुस्थानच्या अपयशाला कारणीभूत ठरले. ऑस्ट्रेलियाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये आरोन झेलक्हस्की, बेले डॅनियल, जेरेमी एडकर्डस् यांना गोल करण्यात यश आले. क्रेग टॉम आणि स्कान मॅथ्यू अचूक निशाणा साधण्यात अपयशी ठरले. हिंदुस्थानकडून एकमेक गोल मनप्रीत सिंगने केला.
सहा देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत हिंदुस्थानने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ४-० गोल फरकाने चिरडून खणखणीत सुरुवात केली होती. त्यानंतर जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या अर्जेंटिनालाही २-१ ने हरविले. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून २-३ गोल फरकाने हिंदुस्थानचा पराभव झाला, तर बेल्जियमविरुद्धची लढत १-१ अशी बरोबरीत सुटली होती.
रविवारी झालेल्या किताबी लढतीत हिंदुस्थानने ‘नंबर वन’ ऑस्ट्रेलियाच्या तोडीस तोड खेळ केला. गोवेर्स ब्लॅकने पेनल्टी कॉर्नरवर २४ व्या मिनिटाला गोल करून ऑस्ट्रेलियाचे खाते उघडले. दरम्यान हिंदुस्थानने अनेक पेनल्टी कॉर्नरच्या संधी दवडल्या, मात्र प्रसाद विवेकने ४२ व्या मिनिटाला भन्नाट मैदानी गोल करून हिंदुस्थानला १-१ अशी बरोबरी साधून दिली. ही बरोबरी शेवटपर्यंत कायम राहिल्याने लढत शूटआऊटमध्ये केली.






























































