सचिनपेक्षा विराट ‘बेस्ट’, नेटकऱ्यांनी हार्दिक पांड्या-राहुलला धुतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा माजी खेळाडू मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात नेहमीच तुलना होते. दोघेही वेगवेगळ्या काळातील खेळाडू असल्याने त्यांच्यात तुलना होणे योग्य नाही, तरीही ती होतेच. परंतु हार्दिक पांड्या आणि राहुलने एका टीव्ही शोमध्ये दिलेल्या उत्तरानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ शोमध्ये अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि सलामीवीर के.एल. राहुल सहभागी झाले होते. या शोमध्ये विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यापैकी कोणत्या फलंदाजांना बेस्ट मानतात असा प्रश्न करणने विचारले. या प्रश्नाला उत्तर देताना दोघांनीही विराटचे नाव घेतले. त्यामुळे नेटकऱ्यांनी दोघांना चांगलेच तुडवले. तसेच शोमध्ये असा प्रश्न विचारणाऱ्या करणलाही नेटकऱ्यांनी झापले.

सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव असून हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल हे संघातील जागा टिकवू शकत नाहीत. या दोघांनीही सचिनबाबत बोलूच नये, अशा शब्दात नेटकऱ्यांनी हार्दिक पांड्या आणि राहुलला सुनावले.