
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याचा साखरपुडा झाला आहे. सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविच (Natasa Stankovic) हिच्यासोबत त्याचा साखरपुडा झाला आहे. साखरपुड्याचे फोटो हार्दिक पांड्याने आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर शेअर करून चाहत्यांना नववर्षाच्या सुरुवातीलाच सुखद धक्का दिला आहे.

हार्दिक पांड्याने नताशासोबतचे तीन फोटो आणि एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्टला त्याने ‘मै तेरा, तू मेरी जाने सारा हिंदुस्थान’ असे कॅप्शनही दिले आहे. हार्दिकने शेअर केलेल्या फोटोमध्ये नताशा हातातील एंगेजमेंट रिंग दाखवताना दिसत आहे. भर समुद्रात एका क्रूजवर दोघांचा साखरपुडा पार पडल्याचे व्हिडीओत दिसते.

हार्दिकसह नताशा हिनेही एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात हार्दिक पांड्या फिल्मी स्टाईलने खाली बसून नताशाला प्रपोज करताना आणि अंगठी घालून किसत करताना दिसतोय. यानंतर दोघेही एका गाण्यावर डान्सही करतात.
याआधी नववर्षाच्या पूर्वसंध्येला पांड्याने इन्स्टाग्रामवर नताशासोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये पांड्या नताशाचा हात हातामध्ये घेऊन उभा दिसत आहे. पांड्याने शेअर केलेल्या फोटोला ‘माझ्या ‘पटाखा’सोबत नवीन वर्षाची सुरुवात करतोय’ (Starting the year with my firework ❣️) असे कॅप्शन दिले आहे. पांड्याने नताशासोबत शेअर केलेल्या फोटोवर क्रिकेटपटू युझवेंद्र चहल, सिद्धेश लाड, हार्दिक पांड्याची वहिणी आणि कृणाल पांड्याची पत्नी पंखुडी शर्मा, अभिनेता अर्जुन कपूर, सोफी चौधरी आणि क्रिस्टल डिसूजासह अनेक नामवंत व्यक्तींनी प्रतिक्रिया दिली.
हार्दिक पांड्याचंही सूत जुळलं, ‘पटाखा’सोबत फोटो केला शेअर करून दिली प्रेमाची कबुली


























































