हार्दिक पंडय़ाचाच सिंहाचा वाटा

मुंबई इंडियन्सच्या पराभवात हार्दिक पंडय़ाचाच सिंहाचा वाटा आहे. तो अजूनही स्वतःला परिस्थितीनुरूप घडवत नाहीय. त्याच्या सामान्य नेतृत्वाचा मुंबई इंडियन्सला खूप मोठा भुर्दंड सोसावा लागतोय. पंडय़ाला कधी कोणता निर्णय घ्यायला हवा, ते जमत नाहीय. पंडयाकडे ए आणि बी प्लॅन नेहमीच असायला हवा. त्याला स्थितीचा अंदाज घेता यायला हवे. तो नवीन खेळाडू नाही. गेली अनेक वर्षे तो हिंदुस्थानी संघातून खेळतोय. जोपर्यंत तो आपल्या अनुभवाचा योग्य वापर करत नाही, तोपर्यंत तो अपयशीच राहणार.