अखेर हार्दिक आला रे…! मुंबई इंडियन्सचे नेतृत्व पंड्याकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेवटच्या क्षणी गुजरात टायटन्सचे नेतृत्व सोडून मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच हार्दिक पंडय़ाच मुंबई इंडियन्सचा भावी कर्णधार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यावर आज मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायझीने हार्दिक पंडय़ाची कर्णधार म्हणून अधिकृत घोषणा केली. आगामी मोसमातच मुंबई इंडियन्सचे नेतृत्व तो सांभाळेल. त्यामुळे मुंबईला पाचवेळा विजेतेपद जिंकून देणारा रोहित शर्मा यापुढे मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसेल.

एक असाधारण नेतृत्व

मुंबई इंडियन्सला आतापर्यंत असाधारण नेतृत्व लाभले आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर हरभजन सिंग, रिकी पॉण्टिंगनंतर रोहित शर्मापर्यंत साऱ्यांनीच संघाचे नाव वेगळय़ा उंचीवर नेलेय. रोहित शर्माने अद्वितीय यश संपादन करताना जबरदस्त संघबांधणी करणेच सदैव ध्येय ठेवले होते. आता हार्दिकही तोच वारसा पुढे नेण्यासाठी सज्ज झालाय. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचा जे यश मिळवून दिलेय त्याबद्दल आम्ही त्याचे मनापासून आभार व्यक्त करतो. 2013 साली रोहित पहिल्यांदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला आणि त्याने संघाचा चेहरामोहराच बदलून टाकला. रोहितने संघाला आयपीएलमधील केवळ सर्वात यशस्वी संघाचे पदक मिळवून दिले नाही तर ‘आयपीएलमधील सर्वात सर्वोत्तम कर्णधार’ म्हणूनही मान मिळवून दिला. आता ती जबाबदारी पंडय़ावर यऊन ठेपलीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

आता बुमराचे काय होणार?

मुंबई इंडियन्समध्ये  हार्दिक परतला तेव्हाच पुसटशी कल्पना आली होती की नव्या मोसमाचा कर्णधार तोच असणार. तेव्हा संघातील भावी कर्णधार म्हणून जसप्रीत बुमराचे नाव आघाडीवर होते, पण हार्दिकच्या एण्ट्रीमुळे त्याच्यावर अन्याय होणार हे उघड होते. त्यामुळे बुमराने आपली नाराजी वेगळय़ा पद्धतीने व्यक्त केली होती. तो मुंबई इंडियन्सला रामराम ठोकण्याची अफवाही पसरली होती. त्यामुळे बुमरा अफवेला सत्यात परावर्तित करतो की तो संघातच कायम राहतो, हे लवकरच समोर येईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

रोहितचे शेवटचे आयपीएल?

मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सोडल्यानंतर तो या वर्षी हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखाली आयपीएल खेळेल. मात्र पुढच्या वेळी तो संघात असेल की नाही, याची कल्पना नाही. एकंदर रोहितचा टी-20 क्रिकेटबाबतचा उत्साह पाहता तो आयपीएलमधून पुढच्या वर्षी निवृत्ती होईल, याची शक्यता क्रिकेट सूत्रांकडून वर्तवली जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)