
हार्डी संधुचा मुंबईमध्ये 16 डिसेंबर रोजी सीग्राम्स इम्पीपिरीयल ब्लू सुपरहिट नाईट्स अंतर्गत ‘इन माय फिलिंग्स’ हा कार्यक्रम पार पडला. मुंबईतील हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस पडला.
या दौऱ्या सांगताना उत्साह व्यक्त करताना हार्डी संधू म्हणाला की, “मुंबईत गाणे परर्फाम करणे हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. इम्पीरियल ब्लू सुपरहिट नाईट्समुळे मला देशव्यापी दौर्याचा मार्ग मिळाला आणि इथल्या लोकांची ऊर्जा खरोखरच रोमांचक आहे. मुंबईतील संगीताबद्दलचे प्रेम आणि आवड प्रचंड आहे. मला आशा आहे की पुढच्या शहरांमध्येही मला असाच उत्साह आणि जोश दिसेल. ‘इन माय फीलिंग्ज’ सहलीसह, माझ्या चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय अनुभव मिळावा हे मी सुनिश्चित करू इच्छितो, असे सांगितले.


























































