हरमनप्रीतची कमाल… धावता येत नव्हते म्हणून चौकार-षटकारांची आतषबाजी

24

सामना ऑनलाईन । प्रॉव्हिडन्स

टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीतने शुक्रवारी रात्री एखाद्या जखमी योद्धय़ासारखा अतुलनीय पराक्रम करीत आपले टी-20तले पहिले तुफानी शतक साकारले. वेस्ट इंडीजमध्ये खेळविण्यात येणाऱ्या महिला टी- 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या सलामीच्या लढतीत पोटदुखीने बेजार झालेल्या हरमनने वेगळीच शक्कल लढवली.

एकेरी-दुहेरी धावा काढल्यास पोटदुखी वाढेल या भीतीने तिने मोठे फटके लगावत षटकार-चौकारांची आतषबाजी करून खणखणीत शतक ठोकले. टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकवणारी पहिली हिंदुस्थानी महिला अशी तिच्या नावाची नोंद क्रिकेट बुकात झाली.

मैदानात जाण्याआधी तिने फिजिओंकडून औषधाचा डोसही घेतला होता. त्यामुळे तिला थोडे बरे वाटत होते. पण पोटाच्या स्नायूंत चमक भरलेली असल्याने धावा घेण्यासाठी धावल्यास पुन्हा पोटदुखीचा त्रास वाढण्याची भीती हरमनला होती. त्यावर तिने उपायही शोधला.

धावा 103
चौकार 07
चेंडू 51
षटकार 08

summary- harmanpreet kaur became first indian woman who made century in t 20 cricket

आपली प्रतिक्रिया द्या