हरयाणात 65 टक्के मतदान, 2014 पेक्षा तब्बल 11 टक्के कमी मतदान

460

हरयाणा विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्राप्रमाणे मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. येथे 65 टक्के मतदान झाले. मात्र, 2014च्या निवडणुकीपेक्षा मतदानाची टक्केवारी तब्बल 11.54 टक्क्यांनी घसरली. गेल्या वेळी 76.54 टक्के मतदान झाले होते. दरम्यान, सर्व वृत्तवाहिन्यांच्या अंदाजानुसार हरयाणात पुन्हा भाजपचे सरकार येण्याची शक्यता आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरयाणात 70.36 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

khattar-on-cycle-maharashtr

यावेळी हरयाणात चौरंगी लढत पाहायला मिळली. भाजपचे मुख्यमंत्री खट्टर, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा, जननायक जनता पार्टीचे दुष्यंत चौटाला आणि इंडियन नॅशनल लोकदलचे अभयसिंह चौटाला या नेत्यांमध्ये लढत झाली.  मुख्यमंत्री खट्टर लढत असलेल्या कर्नालमध्ये अवघे 50 टक्के मतदानाची नोंद झाली. पानिपतमध्ये 45 टक्के मतदान झाले. दरम्यान, रोहतक, बहादूरगड, नारनाअल जिह्यांमध्ये काही मतदान केंद्राबाहेर दगडफेक आणि हाणामारीच्या घटना घडल्या. यात सातजण जखमी झाले.

आपली प्रतिक्रिया द्या