नशेचे औषध पाजून आधी आईची अब्रू लुटली, अश्लील व्हिडिओ काढत अल्पवयीन मुलीवरही केला बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरयाणामधील गुरूग्राम शहरात संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेवर आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर नराधमाने बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. आरोपीने आधी महिलेला औषधाच्या बहाण्याने नशेचा पदार्थ खाऊ घातला आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने अत्याचाराचा व्हिडीओ काढला आणि काही दिवसांनी महिलेला ब्लॅकमेल करत तिच्या नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीवरही बलात्कार केला.

हरीश उर्फ आशु असे आरोपीचे नाव आहे. बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपी पीडित माय-लेकीला देत होता. अखेर अत्याचार असह्य झाल्याने पीडित माय-लेकीने सेक्टर 10 पोलीस स्थानक गाठत आपबिती कथन केली. पोलिसांनी आरोपीविरोधात पोस्को कायदा आणि कलम 376 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीला बेकायदेशीर गावठी कट्ट्यासह अटक केली.

फरिदाबाद हादरले
दुसरीकडे फरिदाबाद शहरात राहणाऱ्या 8 वर्षीय मुलीचा मृतदेह जवळच्या जंगलात सापडल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यास पाठवून दिला. मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.