हरयाणाच्या आरोग्य मंत्र्यांनी टोचून घेतली कोरोना चाचणी लस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनावरील लसीच्या चाचण्याही अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी कोवॅक्सिन परीक्षणात व्हॉलंटीअर म्हणून स्वतः लस टोचून घेतली आहे.

भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने तयार केलेल्या कोरोना महामारीवरील लसीचं पहिल्या आणि दुसऱया टप्प्याचं परीक्षण आणि विश्लेषण यशस्वी ठरलं आहे. त्यानंतर कोव्हॅक्सिनच्या तिसऱया टप्प्यातील परीक्षणाला शुक्रवारपासून हरयाणात सुरुवात झाली.

त्यावेळी डॉक्टरांच्या देखरेखीत आरोग्यमंत्री विज यांनी प्रथम लस टोचून घेतली. देशभरात 26 हजार लोकांवर या लसीची चाचणी करण्यात येणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने तयार केलेल्या लसीच्या मानवी चाचणीत पहिल्या दोन टप्प्यांत जवळपास एक हजार लोकांना लस देण्यात आली होती.