भाजप नेत्याविरुद्ध सीबीआय, ईडीची कारवाई कळवा, लाख रुपये मिळवा; ‘राष्ट्रवादी’च्या पोस्टर्सने वेधले लक्ष

विरोधी पक्ष नेत्यांना नामोहरम करण्यासाठी केंद्रीय एजन्सीजचा वापर करून कारवाई केली जात आहे. अशाच प्रकारची कारवाई भाजप नेत्यांवर कुठेही केली असल्याचे निदर्शनास येत नसल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकत्र्याने संभाजीनगरमध्ये लावलेले पोस्टर्स सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

‘‘भाजप नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयकर खात्याची कारवाई झाल्याचे, भाजपमध्ये गेलेल्यांची कारवाई पुढे चालूच राहिल्याचे कळवा, लाख रुपये मिळवा’’ अशी वाक्य रचना असलेले लक्षवेधी पोस्टर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अक्षय पाटील या कार्यकत्र्याने क्रांतीचौकात लावले आहे. हे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

केंद्रीय एजन्सीजचा वापर करून भाजप सरकार विरोधी पक्ष नेत्यांना नामोहरम करीत आहे. महाराष्ट्रात असा प्रकार सर्रास सुरू आहे. मात्र भाजप नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयकर खात्यांची कुठलीही कारवाई झाल्याचे निदर्शनास येत नाही. ते सर्व धुतल्या तांदळासारखे आहेत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, शिवाय भाजपमध्ये गेलेल्यांची कारवाई पुढे चालू असल्याचे दिसून येत नाही. हेच या कार्यकर्त्याने भाजप नेत्यांवर, भाजपमध्ये गेलेल्यांवर कारवाई पुढे चालू राहिल्याचे कळवा, लाख रुपये मिळवा, असे पोस्टर लावून सुज्ञ जनतेचे लक्ष वेधले आहे.