Video – हास्यजत्रा फेम गौरव मोरेच्या पुढ्यात पडलाय वह्यांचा खच, वाचा चा काय आहे प्रकरण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हास्य जत्रा कार्यक्रमातील सर्वच कलाकारांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. त्यात फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंतचा सर्वांचाच आवडता झाला आहे. नुकताच गौरव मोरे हा एका सिनेमाच्या शूटींगनिमित्त सांगली येथे आला होता. त्यावेळी तेथे असलेल्या एका शाळेतील विद्यार्थ्यांनी गौरवची सही घेण्यासाठी गर्दी केली होती. या विद्यार्थ्यांनी गौरवच्या सहीसाठी शूटींग सुरू असलेल्या ठिकाणी त्यांच्या वह्या जमा करून ठेवल्या होत्या. त्याबाबत गौरवने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

”सांगलीत ( महापरिनिर्वाण) सिनेमाच्या निमित्ताने गेलो होतो आणि जिथे शूट करत होतो त्याच्या बाजूला एक शाळा होती आणि तिथल्या मुलांना समजले की माझं शूटिंग चालू आहे तर मुलं रोज फोटो काढायला आणि ऑटोग्राफ घ्यायला येत होती.तर त्या दिवशी असा हा ऑटोग्राफचा खच माझ्याकडे आला तो हा क्षण थँक्यू सो मच लहान लहान बच्चूना एवढं प्रेम दिल्ल्याबद्दल”, अशी पोस्ट गौरवने केली आहे.