हाथरस प्रकरण; चारही आरोपींना गुजरातला नेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हाथरस बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी सध्या अलिगढ कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. कोर्टाच्या परवानगीनंतर सीबीआयचे पथक आज काराग़ृहात धडकले. त्यांनी या आरोपींना गुजरातच्या गांधीनगरमध्ये पॉलिग्राफ आणि ब्रेन मॅपिंगच्या चाचणीसाठी नेले आहे.

हाथरस प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्य नेतृत्त्वाखाली सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. गेल्या महिन्यात सीबीआयतर्फे 19वर्षाच्या दलित मुलीच्या कथित सामुहिक बलात्कार आणि झालेल्या मृत्य प्रकरणाची चौकशी करण्यात येत होती. हाथरसमधील बुलगढी या गावात राहणाऱया या मुलीचा 29 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या सफदरजंग रूग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर देशभर झालेल्या हलकल्लोळ नंतर या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी मिडिया आणि जनतेच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर दबाव वाढला. अखेर 26 सप्टेंबर रोजी या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली.

ताज महल कात टाकतोय…

आग्रा येथील ऐतिहासिक ताज महलच्या सुशोभीकरणाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. यावेळी ताज महलच्या मुख्य घुमटाचे काम सुरू झाले आहे.