शेअर असावा तर असा..! पाच वर्षांत एका लाखाचे झाले 3 कोटी, गुंतवणूकदार मालामाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेअर बाजारामध्ये चढ-उतार होणे ही सामान्य बाब आहे. काही शेअरच्या किंमती कमी होतात, तर काही शेअर रॉकेटसारखे धावतात. अनेकदा पेनी स्टॉकही अल्पावधीमध्ये गुंतवणूकदारांना मालामाल करतात. इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेड कंपनी हजूर मस्टी प्रोजेक्टस ली. (Hazoor Multi Projects Share) कंपनीच्या शेअरनेही गेल्या पाच वर्षात लखपती गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे.

सरकार गेल्या काही वर्षांपासून इन्फ्रास्ट्रक्चवर लक्ष केंद्रीत करत असून यामुळे या सेक्टरमध्येही तेजी आली आहे. या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचे शेअरही वाढत आहेत. हजूर मस्टी प्रोजेक्टस ली. (Hazoor Multi Projects Share) कंपनीने गेल्या पाच वर्षात गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिला आहे. पाच वर्षांपूर्वी एखाद्याने या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचे आता 3 कोटी रुपये झाले असतील. गेल्या पाच वर्षात या शेअरने तब्बल 33,670 टक्के एवढा भरभक्कम परतावा दिला आहे.

हजूर मस्टी प्रोजेक्टस ली. (Hazoor Multi Projects Share) कंपनीच्या गेल्या पाच वर्षातील कामगिरीवर नजर टाकली असता हा शेअर 1 रुपयांवरून थेट 381 रुपयांवर पोहोचला आहे. 22 फेब्रुवारी 2019 रोजी हजूर मस्टी प्रोजेक्टस ली. (Hazoor Multi Projects Share) कंपनीच्या शेअरची किंमत 1.13 रुपये एवढी होती. 2021 पर्यंत यात काही विशेष वाढ नोंदवली गेली नाही. मात्र त्यानंतर हा शेअर रॉकेटच्या वेगाने पळाला. गेल्या शुक्रवारीही या शेअरला अपर सर्किट लागले आणि 4.99 टक्क्यांच्या वाढीसह शेअरची किंमत 381.60 रुपयांवर पोहोचली.

रियल इस्टेट कंपनी हजूर मस्टी प्रोजेक्टस ली. (Hazoor Multi Projects Share) ची मार्केट कॅप 712.33 कोटी आहे. या कंपनीच्या शेअऱचा ऑल टाईम हाय 428.70 रुपये आहे. तर 52 वीक लो लेव्हल 78.01 रुपये आहे. यावरून या पेनी शेअरने गुंतवणूकदारांचा खिसा भरल्याचे दिसते.

गेल्या पाच वर्षांत हजूर मस्टी प्रोजेक्टस ली. (Hazoor Multi Projects Share) कंपनीच्या शेअरने 33,669.71 टक्के परतावा दिला आहे. तर गेल्या वर्षभरात हा शेअर 294.8.3 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या 6 महिन्यांचा विचार केल्यास या शेअरच्या किंमतीत 193.20 टक्के वाढ झाली आहे.

(टीप – ही फक्त आकडेवारी असून आम्ही कोणताही शेअर खरेदी करण्याचा किंवा विकण्याचा सल्ला देत नाही. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)