अल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी

50
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्य प्रदेशमध्ये उच्च न्यायालयाने एका अल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला गर्भपाताची परवानगी दिली आहे. सदर मुलगी 26 आठवड्याची गरोदर असून तिचे वय अवघे 13 वर्षे आहे.

मुख्य न्यायाधीश रवी शकंर झा आणि व्ही.के शुक्ला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. भोपाळमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. त्यात ती गरोदर राहिली होती. ती सध्या 26 आठवड्याची गरोदर आहे जर या मुलीने या बाळाला जन्म दिला तर दोघांच्याही जिवाला धोका निर्माण होईल असे मेडिकल अहवालात नमूद केले होते. हा अहवाल वाचल्यानंतर न्यायालयाने मुलीला गर्भपाताची परवानगी दिली. तसेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा गर्भपात करावा असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या