मीरा रोडमधील मानसिक रुग्णाला हायकोर्टाचा दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-highcourt

सामना ऑनलाईन । मुंबई

खुनाच्या खटल्याखाली पाच वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या मानसिक रुग्णाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सत्र न्यायालयाने या मानसिक रुग्णाला ठोठावलेली शिक्षा पूर्णत चुकीची असल्याचे स्पष्ट करत न्यायमुर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने मानसिक रुग्णाची निर्दोष मुक्तता केली. मिरा रोड येथील एका मानसिक रुग्णाने झाडांना पाणी घातले नाही म्हणून सुरक्षा रक्षकाची हत्या केली. या प्रकरणी ठाण्याच्या सत्र न्यायालयाने सदर रुग्णाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.