
उसने दिलेले 50 हजार रूपये आजोबांना परत मागितल्याच्या रागातून तिघाजणांनी तरूणावर वार करून गंभीररित्या जखमी केले. ही घटना 26 जूनला रात्री साडेदहाच्या सुमारास हडपसरमधील ओम दिशा सोसायटी परिसरात घडली.
साहिल शेख, नौमान सय्यद, जमीर शेख अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. अम्मार शेख (वय 28) असे जखमीचे नाव असून त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अम्मार आणि साहिल मित्र असून हडपसरमध्ये राहायला आहेत. चार वर्षांपूर्वी अम्मारने साहिलच्या आजोबांना 50 हजार रूपये उसने दिले होते. रक्कम परत कधी देणार अशी विचारणा केल्याचा राग आल्यामुळे तिघाजणांनी अम्मारला बांबूने मारहाण करून कोयत्याने वार केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुशील डमरे तपास करीत आहेत.
























































