हिवाळ्यात बाजरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

आयुर्वेदात असे म्हटले आहे की जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुम्ही ऋतूनुसार अन्न खावे. म्हणजेच हंगामी फळे, भाज्या आणि धान्ये तुमच्या आहाराचा भाग बनवा. हिवाळ्यात अशी फळे आणि भाज्या उपलब्ध असतात जी शरीराला उबदार ठेवतात आणि रोगांपासून वाचवतात. हिवाळ्यात बाजरी खाण्याचे बरेच आरोग्यवर्धक फायदे आहेत. बाजरीची भाकरी खाण्यास चविष्ट तर असतेच शिवाय ही भाकरी हिवाळ्यात खाणे हे खूप फायदेशीर ठरते. फायबरने समृद्ध असलेली बाजरी प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत आहे. बाजरी खाल्ल्याने मधुमेह आणि वजन दोन्ही नियंत्रणात राहते.

आपल्या आरोग्यासाठी कोणते तीळ सर्वात उत्तम, काळे की पांढरे?

आहारात बाजरी समाविष्ट केल्याने, भरपूर फायदे होतात. बाजरी हे पोषक तत्वांनी समृद्ध धान्य आहे. बाजरीची केवळ भाकरीच नाही तर, इतर अनेक पदार्थही आपण बनवु शकतो. १७० ग्रॅम बाजरीत ६ ग्रॅम प्रथिने, २ ग्रॅम फायबर, दररोजच्या गरजेच्या ८ टक्के फोलेट, ६ टक्के लोह, १५ टक्के थायामिन, १४ टक्के नियासिन, १४ टक्के झिंक, ११ टक्के रिबोफ्लेविन आणि ११ टक्के व्हिटॅमिन बी६ असते. बाजरी खाण्याचा मुख्य फायदा ग्लूटेन-मुक्त आहे.

मसूर डाळ मधुमेहींनी आहारात का समाविष्ट करायला हवी, वाचा

आजकाल हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. म्हणून हृदयरोग्यांनी बाजरीचे सेवन करावे. त्यात मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते, जे हृदयासाठी खूप फायदेशीर असते.

मधुमेहींनी कायम आहारात काय खातात याबद्दल सजग राहायला हवे. बाजरीचे पीठ मधुमेहासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बाजरीची भाकरी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते, कारण त्यात भरपूर फायबर असते. बाजरी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून देखील आराम मिळतो.

रोज आहारात बीट समाविष्ट करण्याचे अगणित फायदे, जाणून घ्या

उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी बाजरीचे पिठ आहारात समाविष्ट करणे खूप गरजेचे आहे. बाजरीत आढळणारे पोषक घटक रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.

बाजरी खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका असलेल्यांना त्यांच्या आहारात बाजरी नक्कीच समाविष्ट करावी.

आहारात लोणचे समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या

बाजरीची भाकरी किंवा खिचडी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. बाजरीमध्ये भरपूर फायबर असते, जे तुम्हाला जास्त वेळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करते. बाजरी खाल्ल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते. त्यात प्रथिने चांगली असतात.

हिवाळ्यासाठी बाजरीचे लाडू हा एक उत्तम पर्याय मानला जातो. हे लाडू लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण खाऊ शकतात. हे लाडू बनवण्यासाठी, बाजरीचे पीठ हलके भाजून घ्या आणि गूळ, सुकामेवा, काजू आणि बिया घालून लाडू बनवा. हे खाण्यास स्वादिष्ट असतात आणि शरीराला ताकद देतात आणि हंगामी आरोग्य समस्या टाळण्यास मदत करतात.