
थंडी म्हणजे कोरडा खोकला, सर्दी, खवखव… हे टाळण्यासाठी…
- चिमूटभर वेलची पावडर, एक चिमूट सैंधव मीठ, एक चमचा गाईचे तूप आणि अर्धा चमचा मध यांचे मिश्रण करावे. या मिश्रणाचे सेवन केल्यास खोकल्यावर आराम मिळतो.
- धुळीमुळे घशात होणारी जळजळ, फुप्फुसांना होणारा प्रदूषणाचा त्रास कमी करण्याकरिता वेलची आणि लवंग यांचे मिश्रण हे गुणकारी औषध आहे.
- पाण्यामध्ये एक वेलची टाकावी. पाणी कोमट गरम करावे. या पाण्याने सकाळ-संध्याकाळ गुळण्या कराव्यात. घशाची खवखव कमी होते.
- वेलचीमधून निघणारे तेल एक उत्तम उत्तेजक असून ते ऍण्टिसेप्टिक आहे. यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
- पोट फुगणं, पोटात गॅस होणं, जळजळ यावर वेलची गुणकारी.
- सकाळी अनशापोटी आणि रात्री झोपण्याआधी एक वेलची चावून खावी. त्यावर कोमट पाणी प्यावे. घशाला आराम मिळतो. शिवाय या उपायामुळे सर्दी, खोकला, कफही मोकळा होतो.
- वेलचीची पूड करा. ही पूड पाण्यात एकत्र करा. यामध्ये काही लवंगा घाला. हे पाणी काही प्रमाणात उकळा. मात्र जास्त उकळले जाणार नाही याची काळजी घ्या. जास्त उकळले गेल्यास त्याचा मूळ स्वाद जाऊन पाणी कडवट होऊ शकते. हे पाणी थंड झाल्यावर तीन चमचे मिश्रण साध्या पाण्यामध्ये घालून ते पाणी प्यावे. दुखरा घसा बरा होतो.
- शरीरात असणारे अनावश्यक घटक बाहेर टाकण्यासाठी वेलचीचे पाणी उपयुक्त असते. त्यामुळे शरीरातील खराब घटक बाहेर टाकण्यास किडनीला मदत होते. वेलचीयुक्त चहा प्यायल्याने तणाव कमी होतो.
- वेलची दातांच्या समस्येवर उपयुक्त असते. अनेक माऊथ फ्रेशनर्स आणि टुथपेस्टमध्येही वेलचीचा समावेश असतो.
- वेलचीचे पाणी ठराविक काळ नियमित प्यायल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. अनेकांना घशाचा संसर्ग होतो. त्यांनाही वेलचीच्या पाण्याचा फायदा होतो. ब्राँकायटसीवरही वेलचीचे पाणी उपयुक्त असते.


























































