
कोरोनाच्या या संकटकाळात रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी पौष्टिक आहार महत्वाचा आहे. कोरोना काळात आपण आपली रोगप्रतिकारक क्षमता कशी वाढवू शकतो हे जाणून घेणे आवश्यक आहे. रानभाज्या, ऋतुमानानुसार मिळणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या शरीराला घातक विकारांपासून वाचवतात. मात्र रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आपल्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असायला हवा याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत…
1. कोणत्याही ऋतूत उपलब्ध असणारी ही पालेभाजी खायला तुरट असते. मात्र शरीर चपळ बनवण्यासाठी, ताकद वाढवण्यासाठी ही भाजी उपयुक्त असते. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते.
2. शेवग्याच्या शेंगामध्ये झिंक, अ, क, इ जीवनसत्त्वे आणि लोह असते. यात अँटी ऑक्सिडंट भरपूर असल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच पोटाच्या विकारांवर देखील शेवग्याच्या शेंगा उपयुक्त आहेत.
Health Tips – झोपण्यापूर्वी खजूर खाण्याचे ‘हे’ 8 फायदे जाणून घ्याल तर आश्चर्यचकित व्हाल
3. कोणत्याही भाजीची, चटणीची चव वाढवण्यासाठी लसणाचा वापर केला जातो. पदार्थाची चव वाढवण्यासोबतच लसणात अ, ब, क जीवनसत्त्वांसह लोह, आयोडीन, कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे पोषक तत्त्व आढळतात.
4. आयुर्वेदात मधाला अनन्यसाधारण महत्व आहे. यात अनेक औषधी गुणधर्म आढळतात. तसेच यात एंजाइम आणि अँटीऑक्सिडंट प्रमाण चांगले असते, तसेच ब जीवनसत्व, कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, आयर्न, फॉस्परस, नियासिन, मॅग्नेशियम आणि शियमीन यांसारखी पोषकतत्वे मुबलक प्रमाणात असतात.
https://www.saamana.com/health-tips-immunity-power-avoid-this-things/
5. लिंबामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फॉस्फरस, क्लोरीन इत्यादी घटकांबरोबर प्रोटीन, ब आणि क जीवनसत्त्वे असतात. लिंबू रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते.































































