डाळिंब खा!

> डाळिंबाची साल वाळवून त्याची पावडर करून गुलाबपाण्यात एकत्र करायची आणि स्क्रबप्रमाणे चेहऱ्यावर मसाज करायचा. काही वेळाने चेहरा धुतल्यावर चेहरा तजेलदार वाटेल.

> पोट दुखत असल्यास डाळिंबाच्या अर्धा कप रसात काळी मिरी आणि मीठ घालून तो रस प्यावा, पोटदुखीला लगेच आराम मिळेल.

> शंभर ग्रॅम डाळिंबाची पाने वाटून पाण्यात एकत्र करून ते प्यायल्याने गर्भस्राव थांबतो.

> अतिसाराचा त्रास होत असल्यास अर्धा कप डाळिंबाचा रस प्या. लगेच आराम मिळेल.

> आठ ग्रॅम डाळिंबाच्या सालीची पावडर पाण्यासोबत घेतल्यास मुळव्याधीच्या त्रासापासून आराम मिळतो.

> दहा ते पंधरा ग्रॅम डाळिंबाच्या सालीची पावडर करून त्यात चिमूटभर लवंग पावडर एकत्र करावी. नंतर एका लहान पातेल्यात कपभर पाणी घेऊन त्यात ती पावडर टाकून पाणी उकळून घ्या. जेव्हा पाणी अर्धा कप होईल ते पाणी दिवसातून तीन वेळा प्या. अतिसार आणि आमांशावर गुणकारी मानले जाते.

> दहा ग्रॅम डाळिंबाच्या सालीमध्ये दोन ग्रॅम मीठ एकत्र करून ते चटणीसारखे वाटा. ही चटणी चाटणसारखी घेऊन नंतर मध घ्या. खोकल्यावर आराम मिळेल.

> नाकातून रक्त येण्याचे त्रास होत असेल तर नाकपुडय़ांमध्ये डाळिंबाचा रस घालायचा. रक्त थांबते.