इअरफोन्स…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इअरफोन हा आज मोबाईलचा अविभाज्य भाग झाला आहे. पण याच्या अतिवापरामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतोच शिवाय हृदयाची समस्याही उद्भवू शकते. इअरफोनमधून निघणारा आवाज कानाच्या पडद्याजवळ असल्याने पडद्याला इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे हळूहळू ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. याचा आपल्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. सतत कानाच्या जवळ ऐकल्याने आवाजाचा भ्रम निर्माण होऊ शकतो. तसेच खूप तीव्र आवाजाच्या पट्टीमुळे हृदयाची समस्या उद्भवते. हृदयाचे ठोके जलद पडू लागतात. शिवाय एकमेकांबरोबर इअरफोन्स वापरल्याने कानास संसर्ग होऊ शकतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. यामुळे इअरफोन्सचा वापर मर्यादेत आणि जपून करावा.