
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आज होणारी सुनावणी खटला बोर्डावरच न आल्याने होऊ शकली नाही. सुनावणी आज झाली नसली तरी बुधवार किंवा गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. आज सुनावणी न झाल्याने आता पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज सुनावणीच न झाल्यामुळे आता पुढील तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर अधिक लांबची तारीख मिळाल्यास सुनावणी लवकर घेतली जावी यासाठी राज्य सरकारचे सर्वेच्च न्यायालयातील वकील अर्ज करणार आहेत.
निवडणूक आयोगाला अहवाल सादर
मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवाल आज राज्य सरकारकडून निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला. या अहवालासोबत राज्य सरकारने एक पत्र जोडले होते. या पत्रात अहवालानुसार निवडणुकांत उचित कार्यवाही करावी असे सूचित करण्यात आले होते. अहवाल प्राप्त झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून ग्रामविकास तसेच नगरविकास विभागाच्या सचिवांना बोलावून त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली.






























































