शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबात सुनावणी सुरू, अडीच ते तीन तास युक्तीवाद चालण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kapil sibbal

शिवसेनेत फूट ही कपोकल्पित कथा आहे. शिंदे गटाने आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे बोगस आहेत. त्याची कसून छाननी केली जावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने 17 जानेवारी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे करण्यात आली होती. त्यानंतर 20 जानेवारी म्हणजेच आज पुढील सुनावणी घेण्यात येत आहे. या सुनावणीसाठी दोन्ही बाजूचे प्रतिनिधी, विधिज्ञ निवडणूक आयोगासमोर दाखल झाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपील सिब्बल आपली बाजू मांडणार असून त्यांना पुढील युक्तीवाद अडीच ते तीन तास चालणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, याआधी शिवसेनेत फूट ही कपोकल्पित कथा आहे. शिवसेना पक्ष म्हणून आहे त्याच ठिकाणी भक्कम आहे. असा जोरदार युक्तिवाद शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने करण्यात आला होता. शिवसेनेतून बाहेर पडलेले लोकही धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरच निवडून आले होते, असेही त्यांनी युक्तिवाद करताना म्हटले होते.