विदर्भात सूर्य आग ओकतोय; चंद्रपूर देशात ‘हॉट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूरसह विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकत असून पारा 42 अंशाच्या वर गेला आहे. तर चंद्रपूरमध्ये तापमानाने पुन्हा उसळी घेतली असून, 44.2 अंशासह देशात सर्कांत हॉट शहर ठरले. जगातील पहिल्या दहा उष्ण शहरांमध्येही चंद्रपूर समाविष्ट आहे.

दोन दिवस ढगाळ वातावरणामुळे घटलेल्या पाऱयाने शुक्रवारपासून पुन्हा उसळी घेतली. एप्रिलची उष्ण लाट पुन्हा सक्रिय होत असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 24 तासांत तापमान 1 अंशाने वाढले असून, सरासरीपेक्षा 2 अंशांची काढ झाली आहे. नागपुरात शनिकारी 42.8 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. उन्हाच्या झळा दिकसभर नागरिकांना बसल्या. त्यामुळे काहीशी चिडचिड होत आहे. चंद्रपूरकरांची नेहमीप्रमाणे अंगाची लाही होत आहे.

विदर्भातील इतर शहरांत आज उन्हाच्या झळांनी हैराण केले. अकोला 43.7 अंशावर पोहोचला. याशिवाय वर्धा 43, ब्रह्मपुरी 43.2, अमरावती 42.2, यवतमाळ 42.5, गोंदिया 42, तर गडचिरोली काही अंशी वाढून 40.6 अंशावर पोहोचले. रात्रीच्या किमान तापमानात 24 तासांत घसरण झाली असली तरी सरासरी तापमान 1 ते 2 अंशांनी अधिक आहे. नागपूरचे किमान तापमान 2.7 अंशांनी घसरून 21.6 अंश नोंदविण्यात आले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भवासीयांना पुढचे चार दिवस उष्ण लाटांचा सामना करावा लागणार आहे. पारा आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वेधशाळेने केले आहे.