Maharashtra Heat Wave Chandrapur – चंद्रपूर देशात सर्वात हॉट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पुढचे चार दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज चंद्रपूर 43.4 अंशावर असून जगात तिसऱया क्रमाकांचे तर देशात सर्वात हॉट शहर ठरले आहे. अकोल्याचे तापमान 43.1 अंशावर गेल्याने हवामान विभागाने त्याचे संकेतही दिले आहेत.

गडचिरोली वगळता सर्व जिह्यांचे तापमान 41 अंशांच्या आसपास पोहोचले आहे. मराठवाडय़ातील जिल्हेही प्रकोपात आले आहेत. किमान 2 एप्रिलपर्यंत वातावरणाची ही स्थिती राहणार आहे.