केरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता

4

सामना ऑनलाईन । तिरुवनंतपुरम

गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात रेड ऍलर्ट जारी करण्यात आली आहे. या पावसात आतापर्यंत राज्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात मच्छीमार बेपत्ता झाले आहेत.

राज्यातील इडुक्की, कासरगौड़, कोजीकोड, कन्नूर आणि एर्नाकुलम जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. तसेच समुद्र किनारी भागालाही मोठा फटका बसला आहे.

तिरुवनंतपुरम आणि कोल्लम जिल्ह्यात मासेमारी करायला गेलेल्या सात मच्छीमार बेपत्ता झाले आहेत. त्यांच्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. पावसामुळे रेल्वे वाहतुकीलाही फटका बसला आहे. सलग पावसामुळे इडुक्की जिल्ह्यातील कालरकुट्टी धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे.