नगरमध्ये पावसाचा धूमाकुळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। श्रीगोंदा

नगरमध्ये पावसाने धूमाकूळ घातला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे,कामठी परिसरात झालेल्या तूफान वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या घरांचे पत्रे उडाले असून कांदा चाळींचे अतोनात नुकसान झाले आहे. डाळिंब, लिंबू ,आंबा आदी फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. तर अनेक ठिकाणी ऊसांची पिके भुईसपाट झाली आहेत.

श्रीगोंदा तालुक्यात मंगळवारी चार वाजण्याच्या सुमारास तुफानी वादळी वाऱ्याने मांडवगण परिसरातील कामठी गावच्या हद्दीत घरांचे पत्रे उडाले, विजेचे पोल पडले तर कांदा चाळ पडल्या. येळपणे परिसरात खंडेश्वर विद्यालयाचे तीन खोल्यांचे पत्रे उडाले. सुदैवाने शाळा सुटली असल्याने मोठा अनर्थ टळला.

श्रीगोंदा तालुकयातील येळपणे , पिसोरे परिसर झालेल्या वादळी वाऱ्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे . शेतकऱ्यांचे घरांचे पत्रे उडाले असल्याने संसार उघड्यावर आले आहेत . त्यांना तातडीने मदत मिळावी . तसेच डाळिंब फळबागा आणि लिंबू , आंबा बागा उद्धवस्त झाल्या असल्याने शेतकऱ्यांना तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी गामपंचायत सदस्य संदीप पवार आणि सेवा संस्था उपाध्यक्ष संभाजी धावडे यांनी केली आहे.