
सलग तिसऱ्या दिवशी पावसाने रत्नागिरीला झोडपले.दिवसभर ढगाळ वातावरण आणि मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 130.26 मिमी तर एकूण 1172.30 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. त्यामध्ये मंडणगड 215.10 मिमी, दापोली 94.30 मिमी, खेड 46.50 मिमी. गुहागर 135.60 मिमी, चिपळूण 102.50 मिमी, संगमेश्वर 145मिमी, रत्नागिरी 162.90 मिमी, राजापूर 128.70 मिमी. लांजा 141.70 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.


























































