LIVE: मुंबईत पावसाचा जोर ओसरला, रेल्वे वाहतूक काही मिनिटे उशिराने सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई / ठाणे

गेले तीन दिवस मुंबईत बरसणाऱ्या पावसानं आज सोमवारीही मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार हजेरी लावली. धो-धो बरसणाऱ्या पावसातही मुंबई आणि मुंबईकर थांबले नाहीत. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानं मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

पावसाचे सारे अपडेट:

  • प्लॅस्टिकमुळे गटारं तुंबतात, पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होतो, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट केला आज सकाळचा व्हिडीओ:

मुंबईतील तुलसी तलाव आज सकाळी ७.३० वाजता भरून वाहू लागला. गेल्या वर्षी १४ ऑगस्ट रोजी तुलसी तलाव भरला होता…

tulsi-lake

  • ठाणे-कल्याण-अंबरनाथ-बदलापूर भागातही पाऊस थांबला
  • मुलुंड-भांडूप-घाटकोपर भागातही पावसाची विश्रांती
  • मुंबईच्या वांद्रे, कुर्ला, दादर, परळ भागात पावसाचा जोर कमी झाला आहे.
  • मुंबई- महापालिकेचे कर्मचारी, पोलीस दल नागरिकांच्या मदतीसाठी रस्त्यावर
  • हिंदुस्थानात सर्वाधिक पाऊस पालघर जिल्ह्याातील डहाणूमध्ये पडला. डहाणूत गेल्या २४ तासात ३५४ मिमी पावसाची नोंद.

  • सँडहर्स्ट रोड स्थानकाच्या ट्रॅकवर पडलेल्या भिंतीचा मलबा हटवला. धीम्या मार्गावरची वाहतूक सुरू.

मुंबई विद्यापीठाच्या एमएस्सी सत्र २ व ४ च्या प्रात्यक्षिक परीक्षेस जे विद्यार्थी महाविद्यालयात पोहचू शकले नाहीत त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा विद्यापीठ पुन्हा घेणार व एमए समाजशास्त्र सत्र ३ ची दुपारची लेखी परीक्षा पुढे ढकलली. याचे वेळापत्रक लवकरच लावण्यात येईल, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने जाहीर केले आहे.

  • मुसळधार पावसाने सँडहर्स्ट रोड स्थानकालगतची भिंत स्लो ट्रॅकवर कोसळलीअसून धीम्या गतीच्या गाड्यांची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे

  • अर्नाळा-आगामी रोडवर झाडे कोसळली
  • arnala-tree
  • मुसळधार पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे.
  • जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर झाड पडल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प
  • वसईतील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं
  • विक्रोळीत रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहताना दिसत आहेत
  • ठाण्यात रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
  • वसईच्या मिठागरात पाणी भरले, ४०० जण अडकले
  • डोंबिवलीमध्येही रस्ते जलमय
  • dombivali-water
  • नालासोपाऱ्यात रस्त्यावर बोटीतून वाट काढताहेत नागरिक
  • नालासोपाऱ्यात रेल्वे रुळांवर पाणी
  • मुसळधार पावसामुळे बहुतांश शाळांना सुट्टी
  • विरार पूर्व येथे पाणी साचले
  • viral-east
  • पाहा फोटो- वसई-नालासोपाऱ्यात पाणी साचले
  • nalasopara-rain
  • नाल्यासोपाऱ्यात रुळांवर पाणी साचले
  • मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे २० मिनिटे उशिराने
  • पूर्व द्रुतगती महामार्गावर पवई-जेव्हीएलआर जंक्शनकडे ट्रॅफिक सुरळीत
  • गेल्या २१ तासांमध्ये मुंबईत १०८ मिमी पावसाची नोंद
  • पालघर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू
  • कल्याण, डोंबिवली, भिवंडी परिसरात मुसळधार पाऊस
  • वांद्रे, अंधेरी, दहिसरमध्ये जोरदार पाऊस
  • वसई-विरार, नालासोपाऱ्यात कोसळधार, अनेक भागात साचलं पाणी
  • पश्चिम रेल्वेची वाहतूक ५-१० मिनिटे उशिराने
  • मुंबई-ठाण्यातील रस्ते वाहतूक सुरळीत
  • ठाण्यामध्ये रात्रभर पाऊस, पहाटे जोर वाढला
  • अंबरनाथ-बदलापूरमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस
  • मुसळधार पावसामुळे काही भागात वीज पुरवठा खंडित
  • मुंबईच्या पूर्व उपनगरात अनेक भागात जोरदार पाऊस
  • कोकण किनारपट्टीवर पावसाची संततधार सुरूच
  • जलधारांनी भिजली मुंबई, रविवार पाण्यात
  • पावसामुळे शाळा व महाविद्यालयांना सुट्टी