मुंबईसह मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता, ऑरेंज ऍलर्ट जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत आज ऑरेंज ऍलर्ट जारी करण्यात आला आहे. काल रात्रभर पाऊस पडत असल्याने भायखळा, हिंदमाता, कुर्ला, किंग सर्कल या भागात पाणी साचले होते. मुंबई आणि उपनगरात पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्य़ासह जोरदार पावसाची शक्यता आहे. यावेळी 30 ते 40 किमी प्रति ताशी वेगावे वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


हवामान विभागाने कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कर्नाटकाच्या किनारी भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, दक्षिण गुजरातच्या वेगवेगळ्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कर्नाटकात पुढील 12 तासात 30 ते 40 किमी प्रति ताशी वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच या भागात 50 किमी प्रति ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनार्यानलगतच्या भागात 40 -40 ते 60 किमी प्रति ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उद्या सांयकाळपासून या वार्यांtचा वेग कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.