कुडाळला वादळाचा तडाखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कुडाळ

कुडाळ तालुक्यात शनिवारी साडे तीन वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वार्‍याचा तडाखा ठिकठिकाणी बसला. नेरूर येथे घरावर झाडे पडून तसेच छप्पर उडुन घरांचे मोठे नुकसान झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

कुडाळ शहरातील श्रीरामवाडी येथे एका स्कॉर्पिओ गाडीवर आंब्याचे झाड पडून गाडीचे नुकसान झाले. पिंगुळी काळेपाणी येथील दोन नर्सरी शेड मोडल्या. कुडाळ लक्ष्मीवाडी व अणाव येथे रस्त्यावर माड पडून वाहतूक काही काळ ठप्प झाली. शहरात पोलीस स्टेशनजवळ शेडचा पत्रा पडून एक कामगार जखमी झाला. तालुक्यात ठिकठिकाणी वीज तारा तुटून वीज पुरवठा खंडीत झाला. या वादळाने तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.