मालवणात धुव्वाधार पावसाचा कहर, नदी, नाले ओव्हरफ्लो; मंदिर, रस्ते, पूलही पाण्याखाली

752

रौद्ररूप धारण केलेल्या पावसाचा कहर बुधवारी मालवणात दिसून आला. धुव्वाधार पावसाने मालवणला अक्षरशः झोडपून काढले. नदी, नाले ओव्हरफ्लो झाले असून भातशेती पाण्याखाली गेली आहे. काही ठिकाणी रस्ते, छोटे पूल पाण्याखाली आहेत. सखल भागातील काही घरे, मंदिरे यांना पाण्याने वेढा दिल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनांमुळे नुकसान झाले आहे.

दरम्यान, सिंधुदुर्गात पावसाचा जोर 11 ऑगस्ट पर्यंत कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुसळधार पावसामुळे समुद्रही खवळला असून उसळणाऱ्या जोरदार लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत.

img-20200708-wa0015

मसुरे, बागायत व अन्य नदी काठची गावात पाणी घुसले होते. शेती पाण्याखाली गेली. कालावल खाडी पात्रात असलेल्या मसुरकर व खोत जुवा बेटांवर पाणी घुसले. पाणी असेच वाढत राहिले तर घरातही पाणी घुसले अशी भीती येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तहसीलदार अजय पाटणे व तालुका प्रशासन तालुक्यातील स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या