
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया वाहनांची संख्या मोठी असल्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककाsंडी टाळण्यासाठी 23 ऑगस्टपासून अवजड वाहनांना मनाई करण्यात आली होती. उद्या 8 सप्टेंबरच्या रात्री 8 वाजल्यापासून अवजड वाहनांची वाहतूक पूर्ववत होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सातत्याने रखडत आहे. त्यातच अवजड वाहनांमुळे या महामार्गावर गणेशोत्सवाच्या काळात मोठी वाहतूककाsंडी होते. ती दूर करण्यासाठी पोलिसांचीही दमछाक होते. त्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना मनाई करण्यात आली होती. गौरी-गणपती विसर्जनानंतर बहुतांश चाकरमानी कोकणातून मुंबईला परतले. शनिवारी अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या बाप्पांना निरोप दिल्यानंतर उर्वरित चाकरमान्यांनीही मुंबईचा वाट धरली आहे. सोमवारपर्यंत ते मुंबईत पोहोचतील.