कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालय आज देणार निर्णय

सामना ऑनलाईन। हेग

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांचा आरोप ठेवत फाशीची शिक्षा ठोठावलेले हिंदुस्थानचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासंबंधी निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालय बुधवारी देणार आहे. हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अब्दुलकॉवी अहमद युसूफ संध्याकाळी 6.30 वाजता निर्णय देणार आहेत.

कुलभूषण जाधव यांच्यावरील दोन्ही आरोप हिंदुस्थानने फेटाळले आहेत. जाधव हे इराणमध्ये व्यवसायानिमित्त गेले असताना पाकिस्तानी लष्कराने पाकिस्तान-इराण सीमेजवळून त्यांचे अपहरण करून त्यांच्याकडून सक्तीने हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांचा कबुलीजबाब घेतला. त्यानंतर त्यांना कोणताही वकील न देता एप्रिल 2017मध्ये पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावल्याचा आरोप हिंदुस्थानने केला आहे. या फाशीविरोधात हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात तक्रार दाखल केली होती. जाधव यांच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली.

आपली प्रतिक्रिया द्या