
‘हॅलो डार्लिंग’ येत्या रविवारी
‘व्हेरिएशन्स’ प्रस्तुत आणि योगेश संघवी यांचं दिग्दर्शन असलेलं ‘हॅलो डार्ंलग’ हे हिंदी नाटक येत्या रविवारी वांद्रे पश्चिम येथील ‘रंगशारदा’ हॉलमध्ये रंगणार आहे. मिर मुनीर यांनी लिहिलेल्या या नाटकात केवळ पाच कलाकार आहेत. पण हे नाटक भानू आणि अनिता या दोघांवर बेतलेले आहे. या विनोदी नाटकात विंदू दारासिंह आणि दीपशिखा नागपाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर त्यांच्यासोहत पायल गोगा कपूर, सोनिया बिरजे आणि नासिर खान यांच्याही गमतीशीर भूमिका आहेत. 19 ऑगस्टला रविवारी रंगशारदामध्ये हे नाटक रात्री 8 वाजता दाखवण्यात येणार आहे.


























































