
कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी राज्यातील आरोग्य कर्मचारी विशेष मेहनत घेत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी सार्थ प्रतिष्ठान पुढे सरसावले असून वरळीत पोद्दार रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी सार्थ प्रतिष्ठानातर्फे तब्बल 1 हजार पीपीई किटसचे वाटप नुकतेच करण्यात आले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण, पर्यटन मंत्री, युवासेना प्रमुख, शिवसेना नेते, वरळी विधानसभा आमदार आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने सार्थ प्रतिष्ठानाचे सर्वेसर्वा, शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. प्रतिष्ठानाचे सरचिटणीस दिनेश बोभाटे यांच्या संकल्पनेतून शिवसेना विभागप्रमुख, बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. यावेळी डॉ. गोल्लार, प्रतिष्ठानाचे विश्वस्त उमेश नाईक, राम विश्वासराव, मिनेश बोभाटे, अमोल कदम, ललित आत्तावार, सुधाकर नर, प्रदीप मोरे, महेश पेडणेकर, चंद्रकांत पाटील, जय हडकर आदी उपस्थित होते.

























































